आरोपीच्या तोंडाला लावली चिकटपट्टी; अमेरिकन न्यायालयातील घटना 

ओहियो (अमेरिका): आरोपीचे तोंड टेप लावून बंद करण्याचा प्रकार ओहियोतील एका न्यायालयात घडला आहे. सुनावणीच्या वेळी गप्प न बसणाऱ्या आरोपीच्या तोंडाला टेप लावून ते बंद करण्याचा आदेश न्यायमूर्तींनाच द्यावा लागला. आरोपी फ्रॅंकलिन विल्यम्स याला वारंवार ताकिद देऊनही त्याने बोलणे न थांबवल्याने न्यायमूर्ती जॉन रसो त्याच्या तोंडाला टेप लावून ते बंद करण्याचा आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिला. त्याची ताबडतोब अंमलबजावणी करत नारंगी रंगाचा टीशर्ट घातलेल्या आरोपी विल्यम्सच्या तोंडाला लाल रंगाची टेप लावून त्याचा आवाज बंद केला.
सशस्त्र दरोडे आणि अन्य प्रकरणात फ्रॅंकलिन विल्यम्सला 24 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलेला आहे. डिसेंबर 2017 मध्ये आरोप सिद्ध झालेला विल्यम्स केसची सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच तुरुंगातून पळून गेला होता. जुलै 2018 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालात सलग अर्धा तास विल्यम्स बोलत राहिल. अनेक सूचना देऊनही तो गप्प न बसल्याने अखेर टेप लाऊन त्याचे तोंड बंद करण्यात आले. त्याचे म्हणणे आपण त्याच्या वकिलाकडून ऐकू असे न्यायमूर्ती जॉन रसो यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)