बीड तालुक्‍यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील देवीदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादामांवर उचल घेऊन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भूईज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

या दोघांना अटक करण्यासाठी भूईज ठाण्याचे पोलीस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि भोसले हे बीड जिल्ह्यात आले होते. त्यांनी पिंपळनेर पोलिसांना कारवाईबद्दल कल्पना दिली असता पोलीस कर्मचारी कांदे यांना त्यांच्यासोबत मदतीला देण्यात आले.

या सर्वांनी लक्ष्मी तांडा येथे जाऊन गोवर्धन राठोड यास ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.दरम्यान त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनिता राठोड, मुलगा संजय राठोड तसेच त्याचे गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकात रेखू राठोड (सर्वजण रा. नाळवंडी लक्ष्मीतांडा) यांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)