आरोपीची पत्नी कॅन्सरपीडिता असल्याने 11 लाखाची माफी आणि खटला मागे

अहमदाबाद (गुजरात्त): आरोपीची पत्नी कॅन्सरपीडिता असल्याने त्याला 11 लाख रुपयांची माफी देण्यात येऊन त्याच्यावरील खटला मागे घेण्यात आला आहे. आजच्या युगात दुर्मीळ अशी उदात्त घटना अहमदाबादच्या मेट्रो न्यायालयात घडली आहे.

आरोपीने दिलेला 11 लाख रुपयांचा चेक न वटल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. प्रिंटिंग अँडस्‌ पॅकेजिंग कंपनीचे सहसंचालक प्रकाश पटेल यांनी संचालक महेंद्र पटेल यांच्या आदेशानुसार हा खटला दाखल केला होता, त्यांच्या एका ग्राहकाने दिलेला 11 लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्यानंतर त्या ग्राहकाने दुसरा चेक दिला. पण तो देखील बाऊन्स झाल्याने त्याच्यावर खटला दाखल केला. मात्र सुनावणीच्या दरम्यान आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे. आपल्याकडे पैसे नाहीत. हवे तर आपल्याला तुरुंगात टाका असे त्याने संगितले.

हे समजताच संचालक महेंद्र पटेल यांनी त्याला 11 लाख रुपये माफ करून खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या संचालकांचे आभार मानून आपली परिस्थिती सुधारल्यानंतर आपण कंपनीचे पैसे अवश्‍य भरू असे आरोपीने म्ह्टले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)