आरोपांचा तपशील माध्यमांमध्ये आल्याने सरन्यायाधिश संतापले 

सीबीआय प्रमुखांची केली कान उघडणी

नवी दिल्ली – सीबीआय मधील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबतचा तपशील प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्याने सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी आज झालेल्या सुनावणीच्यावेळी तीव्र संताप व्यक्त केला. तुमची केस आम्ही सुनावणीसाठी घ्यावी असे वाटत नाही अशा शब्दात त्यांनी सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्या वकिलांना सुनावले.

आज कोर्टाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेच सरन्यायाधिशांनी वर्मांचे वकिल फाली नरीमन यांना काही कागदपत्रे दिली आणि ही वाचून आम्हाला काही मदत करा असे त्यांनी त्यांना सुचवले. यावर तुम्ही तुमचा अभिप्राय द्या तोपर्यंत आम्ही दुसरी केस सुनावणीला घेतो असे नमूद करीत त्यांनी सीबीआय विषयीची सुनावणी तात्पुरती स्थगित केली.

-Ads-

सरन्यायाधिशांनी फाली नरीमन यांना दिलेली कागदपत्रे म्हणजे वायर या वेबसाईटवर सीबीआय मधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा सारा तपशील होता. हे माध्यमांमध्ये कसे आले अशी विचारणा सरन्यायाधिशांनी नरीमन यांना केल्यानंतर नरीमन म्हणाले की त्याची आम्हाला कल्पना नाही. आम्हालाही हा तपशील माध्यमांपर्यंत पोहचणे मान्य नाही. ज्याने हा प्रकार केला आहे त्याला कोर्टाने समन्स जारी करावीत अशी मागणीही नरीमन यांनी केली. सीबीआयचे अधिकारी मनिष कुमार सिन्हा आणि वर्मा या दोघांनीही ज्या याचिका कोर्टात केल्या आहेत त्याचा सारा तपशील माध्यमांपर्यंत पोहचला आहे. हे आक्षेपार्ह आहे असे सरन्यायाधिशांनी त्यांना सुनावले.

दरम्यान वायर या वेबसाईटने म्हटले आहे आहे की अलोक वर्मा यांनी त्यांच्यावरील आरोपांच्या संबंधात दक्षता आयोगाला जो खुूलासा पाठवला आहे त्या माहितीवर आधारीत आम्ही हा तपशील दिला आहे. आम्ही हा तपशील वर्मा यांनी कोर्टात सादर केलेल्या याचिकेतून घेतलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)