आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब

195 देशांमध्ये भारताचा 145 वा नंबर


भारतापेक्षा बांगलादेश, श्रीलंका आणि भूतानची स्थितीही चांगली

नवी दिल्ली – आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब असून 195 देशांमध्ये भारताचा नंबर 145 वा लागला आहे.

एका जागतिक पहाणीत ही स्थिती दिसून आली आहे. तथापी 1990 सालापासून भारताने आरोग्य क्षेत्रात बरीच चांगली कामगीरी नोंदवली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य सेवेचा दर्जा आणि त्याची उपलब्धता इत्यादी निकषांवर ही पहाणी करण्यात आली.

सन 2016 साली भारताने या बाबतीत बरीच चांगली कामगिरी नोंदवत 41.2 गूण मिळवले होते असेही यात नमूद करण्यात आले आहे. सन 2016 च्या पहाणीनुसार केरळ आणि गोव्यात आरोग्य सेवांची स्थिती चांगली होती तर आसाम आणि उत्तरप्रदेशात या सेवेची स्थिती अत्यंत खराब होती.

या विषयीची जी जागतिक क्रमवारी जाहींर झाली आहे त्यात चीनचा नंबर 48 वा, श्रीलंकेचा नंबर 71 वा, बांगलादेशचा नंबर 133 वा, आणि भूतानचा नंबर 134 वा आहे. म्हणजेच आरोग्य सुविधांच्या दर्जाच्या बाबतीत हे देश भारताच्याही पुढे आहेत. अत्यंत खराब आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या जगातील सर्वात खालच्या पाच देशांमध्ये आईसलॅंड, गनिया-बिसाऊ, चड, आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)