आरोग्य शिबिरामध्ये पाचशे नागरिकांची तपासणी

दिघी- भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोपखेल येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा सुमारे 500 नागरिकांनी लाभ घेतला. बऱ्याच नागरिकांना त्यांना होत असलेल्या आजाराबद्दल माहितीच नव्हती. या शिबिरामुळे अनेकांना आपल्या तब्येतीविषयी योग्य ती माहिती मिळाली असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिघी बोपखेल प्रभागाच्या नगरसेविका हिराबाई गोवर्धन घुले व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले यांनी पुढाकार घेऊन केले. शहरात आजाराच्या साथी मुळे लोक मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडत असल्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे यांनी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष घुले बाबा, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन घुले, बाळासाहेब घुले यांच्या उपस्थितीत केले. सूत्रसंचालन गोङा आंबेसर यांनी केले. आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यावेळी मेडीकल डायरेक्‍टर डॉ. प्रमोद कुबडे, न्युरोसर्जन डॉ. विवेक बोंडे, हृद्‌यरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत उपाध्याय, महात्मा फुले योजना समन्वयक डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, डॉ. सचिन बाहेकर यांनी तपासणी केली. 48 रुग्णांना कानाचे मशीन, 22 रुग्णांना कानाचे पुढील उपचार, 24 रुग्णांना मधुमेह निदान, 12 रुग्णांना दमा व अस्थमा, 20 रुग्णांना मणक्‍याचे ऑपरेशन, 10 रुग्णांना संधिवात, 6 रुग्णांना डोळ्याचे विकाराचे निदान, असे उपचार सुरू करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)