आरोग्य शिबिरात 215 रुग्णांवर उपचार

नीरा- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लक्ष्मीनगर (निंबुत) येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 215 जणांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर उपचार ही करण्यात आले. रुग्णांना लस व टेमिफ्लयूच्या गोळ्या देण्यात आल्या. जिल्हा परिषदचे सदस्य प्रमोद काकडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. व्ही. आर. हरमकर, के. एस. शेख, वसंत पवार, शिवाजी शिंदे, जयराज पवार आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद काकडे म्हणाले की, शासकीय आरोग्य विभागात आमूलाग्र बदल झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणती ही शंका न घेता रुग्णांना दाखल केल्यास वेळेवर उपचार मिळू शकतात. डॉ. मनोज खोमणे यांनी आरोग्य समस्या व त्याचे निराकरण या विषयावर मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)