आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज – डॉ. भोईटे

पळसदेव – आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज आहे. त्यातून आर्थिक नुकसान टाळता येईल, असे मत ह्दय रोगतज्ज्ञ रमेश भोईटे यांनी व्यक्त केले. पळसदेव येथील पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सर्व रोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते.

या वेळी अस्थिरोग तज्ज्ञ विनोद राजपुरे, स्त्रीरोगतज्ज्ञ अमोल खानावरे, नेत्र चिकित्सक डॉ. संतोष रनवरे यांनी रुग्णाची तपासणी व उपचार केले. 387 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर 15 रुग्णांवर मोतीबिंदू शत्रक्रिया होणार असल्याचे सचिव पूजा पवार यांनी सांगितले. यावेळी डॉ. शीतलकुमार शहा , डॉ. औदुंबर हिंगमिरे, माजी उपसरपंच संतोष काळे, नानासाहेब नायकवडी, पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पवार, कालिदास गोडगे, स्वप्नील काळे, उपसरपंच तुकाराम काळे, महेंद्र काळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)