आरोग्य विभागाच्या 35 टक्के लाभार्थ्यांची आधार नोंदणी

 

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रावर विविध योजनांचे लाभार्थी तसेच महिला व नवजात बालके यांची आधार नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यातील 35 टक्के लाभार्थ्यांची आज अखेर आधार नोंदणी झाली आहे. तसेच 33 टक्के गर्भवती महिलांचे आधार नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ भगवान पवार यांनी दिली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड क्रमांकची सक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने वैयक्तिक योजनाच्या लाभाच्या योजनातील वस्तूचे अनुदान आधार क्रमांकाच्या आधारे थेट बॅंक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे, विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच पंतप्रधान
सुरक्षित मातृत्व अभियान जननी सुरक्षा योजना, मातृत्व संवर्धन दिन व महिलांसाठी असलेल्या विविध आरोग्य विभागाच्या योजनांच्या लाभार्थी महिला व त्यांचे नवजात बालकाला आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आधार कार्डची आवश्‍यकता आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आधारकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आधार नोंदणी करण्यासाठी रहिवाशी पुरावा, फोटो ओळखपत्राचा पुरावा सोबत घेऊन आधार कार्ड नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध योजनाच्या 85 हजार 842 लाभार्थी आहेत. यापैकी 32 हजार 450 जणांची आधार नोंदणी केली आहे. तसेच 68 हजार 583 गर्भवती महिलांपैकी 22 हजार 959 जणांनी आधार नोंदणी झाली आहे. यापैकी 15 टक्के लाभार्थ्यांनी बॅंक खाते क्रमांक दिला आहे. याशिवाय 2 हजार 835 आशा वर्कर आणि 587 एएनएम नर्ससनेही आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक केला आहे. नागरीकांनी आधार नोंदणीसोबत बॅंक खाते क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमा करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)