आरोग्य विभागाचे “अॅॅप’ लवकरच रुग्ण सेवेत

तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात : नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार

पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या सेवेसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या अॅॅपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या अॅॅपमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टर उपलब्ध आहेत की नाही, ही माहिती घरबसल्या मिळणार असून, डॉक्‍टरांची अपॉईमेंटही या अॅॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यामुळे हे अॅॅप नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याने लवकर ते कार्यान्वित करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

-Ads-

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग दिवसेंदिवस हायटेक होत आहे. आरोग्य सभापती प्रविण माने यांनी आरोग्य विभागावर अधिक लक्ष केंद्रीत करत जिल्ह्यातील मोडकळीस आलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र चांगल्या स्थितीत बांधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्याचे काम सुरू असून, काही केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य केंद्रामधील सेवा-सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन त्याप्रमाणे बदलही करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रातील कामांमध्ये सुसूत्रता यावी, तक्रारींचा पाढा कमी व्हावा आणि रुग्णांचे हेलपाटे थांबावे यासाठी आरोग्य विभागाने आणखीन एक पाऊल टाकत रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत पध्दतीचे अॅॅप तयार करण्यात आले आहे.

भोर तालुक्‍यातील भोंगवली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी एक अॅॅप तयार करण्यात आले आहे. सध्या प्रायोगीक तत्वावर हे अॅॅप सुरू आहे. त्याच धर्तीवर आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यासाठी अॅॅप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या अॅॅपमध्ये नागरिकांना आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कोणते डॉक्‍टर कधी असणार, त्यांचा ओपीडी दिवस कोणता याची माहिती मिळणार असून, नागरिकांना घरबसल्या या अॅॅपच्या माध्यमातून डॉक्‍टरांची अपॉईंमेंट घेता येणार आहे. डॉक्‍टर उपलब्ध नसतील तर “रेड’ चिन्ह असेल आणि असतील तर “ग्रीन’ चिन्ह असेल. त्यामुळे नागरिकांचा हेलपाटा वाचणार आहे.

रुग्णांची सर्व माहिती ऑनलाईन ठेवणार
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांची माहिती एकत्रीत करून त्याला ओपीडी नंबर देणार. ज्या ज्या वेळी तो तपासणीसाठी केंद्रात येईल त्यावेळी त्याच्यावर कोणते उपचार झाले, त्याला डॉक्‍टरांनी काय सल्ला दिला, रुग्णाला काय झाले होते, याची सर्व माहिती ही ऑनलाईन मिळणार आहे. रुग्णाने केवळ रजिस्टर ओपीडी नंबर दिल्यावर ही सर्व माहिती रुग्णाला आणि डॉक्‍टरांना पाहाता येणार आहे. या अद्यायवात सुविधांबरोबर नवीन अॅॅपमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)