आरोग्य दुतांच्या मदतीने वारकऱ्यांची निरोगी वारी

जागेवर आणि त्वरीत आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नवीन संकल्पना ;
वारकरी आणि पालखी सोहळा प्रमुखांकडून कौतुक

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.4 – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यावर्षी पालखी सोहळ्यात “आरोग्य दूत’ ही नवीन संकल्पना राबवली. या “आरोग्य दुता’च्या माध्यमातून वारकऱ्यांना जागेवर आणि त्वरीत आरोग्य सेवा मिळत होती. त्यामुळे वारकरी आणि पालखी सोहळा प्रमुखांकडून या दुतांचे आणि आरोग्य विभागाचे कौतुक केले. दरम्यान, यंदाच्या पालखी सोहळ्यात आरोग्य दुतांनी तब्बल दहा हजाराहून अधिक वारकऱ्यांना उपचार देऊन सेवा देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहमी नवनवीन संकल्पना राबवून अन्य जिल्ह्यांसाठी पुणे जिल्हा परिषद ही “रोल मॉडेल’ ठरत आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या पालखी सोहळ्यातही “आरोग्य दूत’ ही संकल्पना राबवून जिल्हा परिषदेने आपल्या कामातील वेगेळेपण दाखवून दिले आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर आरोग्य विभागाकडून “आरोग्य दुता’ची नेमणूक केली होती. पालखी सोहळ्यात आळंदीपासून लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. त्यांना प्रशासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये आरोग्य सुविधा ही महत्त्वाची असून, दरवर्षी पालखी मार्गावर रुग्णवाहिका, डॉक्‍टर यांची नेमणूक केली जाते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी “ओपीडी’ची सुविधा केलेली असते.

मात्र, औषधोपचार घेण्यासाठी प्रत्येकवेळी त्याठिकाणी येणे वारकऱ्यांना शक्‍य नसते. अनेक दिंड्या या पालखी मुक्कापासून लांब असतात. अशा परिस्थिती उपचाराची गरज असली तरीही वारकरी अंगावरच दूखण काढतात. त्यामुळे वारकऱ्यांना जागेवर उपचार कसे मिळतील या विचाराने “आरोग्य दूत’ ही संकल्पना उदयला आली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली “आरोग्य दूत’ कशाप्रकारे काम करतील, वारकऱ्यांना सेवा देतील याबाबत नियोजन करण्यात आले. त्यानुसार दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येकी 15 दुचाकीवरील आरोग्य दूत नेमण्यात आले. या दुचाकीवर आरोग्य किट ठेवण्यात आली होती. त्यामध्ये प्राथमिक उपचारासाठी लागणारी औषधी आणि आवश्‍यक साधने देण्यात आली होती. त्यानुसार पालखी सोहळ्यात फिरून औषधोउपचाराची आवश्‍यकता असलेल्या वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना औषधी देण्याची सेवा या दूतांनी केली.

——————————————

दहा हजार वारकऱ्यांना दिले उपचार
“ओपीडी’मार्फत तब्बल दोन लाख रुणांवर उपचार करण्यात आले. तर, आरोग्य दूत यांनी दहा हजाराहून अधिक रुग्णांना जागेवर जावून उपचार दिले. दरम्यान, आरोग्य दूत यांनी दिलेल्या सेवेचे वारकऱ्यांनी कौतुक केले. पालखी सोहळ्यातील आरोग्य दूत यांचा अनुभव पाहाता, पुढील वर्षी या दुचाकींना रुग्णवाहिकेचा दिवा लावण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार देण्यास अडथळे येणार नाही. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ मोठ्या यात्रा होत असतात. या यात्रेमध्येही आरोग्य दूत नेमूण त्याठिकाणी सेवा देण्याचा विचार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)