आरोग्य तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील विठ्ठलवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोग योजनेच्या निधीतून विठ्ठलवाडी ग्रामपंचायत आणि महाळुंगे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. ब्लड प्रेशर, मधुमेह, हिमोग्लोबिन तसेच कॅन्सर आदी महत्त्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरासाठी महाळुंगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्यसेविका सी. एन. ऊईके, एस. के. कुदळे, एस. के. भोये, पूजा राजगुरु, एस. एस. उनकुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिराचे उद्‌घाटन सरपंच तुकाराम वायाळ, उपसरपंच प्रदीप ढगे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना चिखले, ज्योती चिखले, कल्पना चिखले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामसेविका शारदा घोडे, राजाराम चिखले, श्‍वेता चिखले, एस. गवारी, स्वप्नाली वायाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिराला भेटी दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)