आरोग्य केंद्र “असून अडचण, नसून खोळंबा’

पिंपरी – “एसटी’च्या वल्लभनगर आगारात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने हे केंद्र असून अडचण व नसून खोळंबा ठरत आहे. चालक व वाहकांना काही आरोग्याच्या समस्या असल्यास त्यांना पुण्यात जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी होत आहे.

सध्या वल्लभनगर आगारात साधारण दीडशे वाहने धावतात. त्यामुळे त्या पटीत वाहक व चालक असल्यामुळे येथे स्वतंत्र डॉक्‍टरांची आवश्‍यकता आहे. या ठिकाणी मुक्‍कामाची वाहने असतात. त्यामुळे येथील वाहकाला अथवा चालकाला गरज पडल्यास तातडीने वैद्यकीय उपचाराची सोय नाही. त्यांना इतर खासगी अथवा महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठी कुंचबना होत आहे. दुसरीकडे येथे नेमण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पुण्यासह परिसरातील आगाराचीही जबाबदारी असते. त्यामुळे ते केवळ मागणी असल्यास या आगारात येतात. अन्यथा कर्मचाऱ्यांना पुण्यातील स्वारगेट आगारात जावे लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एसटी’ चालकांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळावेत यासाठी आगार परिसरातच केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, त्यांची वेळ ठरली आहे. त्या मानधनावर असल्याने ते या आगारात क्‍विचतच येत असल्याचे निदर्शनास आले. दुसरीकडे चालकाला वेळोवेळी त्याची तपासणी करण्याची गरज असते. पुण्यात तपासणी करुनच ते येथे येतात. त्यांनतरच त्यांना “स्टेअरिंग’ हाती देण्यात येते, असे अधिकारी सांगतात. मात्र, त्यांना पिंपरी आगारात ती सोय उपलब्ध करणे देणे महत्वाचे आहे. चालकाची दृष्टी आणि मानसिक स्थिती चांगली असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीबरोबरच समुपदेशन होण्याची गरज आहे.

आगारात सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी वेळेवर होत असते. तसेच, केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सकाळी येत असतात. वेळ पडल्यास खासगी रुग्णालयातही कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यात येतात. तसेच, समुपदेशन कार्यशाळाही वेळोवेळी होत असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आगार प्राधान्य देत आहे.
– संजय भोसले, प्रमुख, वल्लभनगर एसटी आगार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)