आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी 36 कोटींचा निधी मंजूर

सभापती प्रविण माने यांची माहिती ः बांधकाम, विस्तारीकरकण, देखभाल-दुरुस्ती करणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 16 – जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम व्हावी. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या इमारती सुसज्ज आणि चांगल्या असाव्यात, यासाठी आरोग्य विभागामार्फत 2017-18 या वर्षातील बृहत आराखड्यानुसार जिल्ह्यासाठी तब्बल 36 कोटी 26 लाखांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आता लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रविण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांना तत्पर आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी. आरोग्य केंद्राचा परिसर आणि इमारत स्वच्छ असावी. यासाठी आरोग्य विभागाकडून 2017-18 या आर्थिक वर्षासाठी बृहत आराखाडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचे बांधकाम, विस्तारीकरण, देखभाल-दुरूस्ती या कामासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या आराखड्यानुसार 36 कोटी 26 लाखांच्या प्रशासकीय कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, काही सुरू आहेत. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरवात केली जाणार आहे. ही कामे गुणवत्तापूर्ण असतील, असे प्रविण माने यांनी सांगितले.

मंजुरी देण्यात आलेल्या कामांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम आणि विस्तारीकरणासाठी एकूण 18 कोटी 73 लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम आणि विस्तारणीकरण यासाठी 11 कोटी 65 लाख रूपयांची कामे मंजूर केली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची देखभाल दुरूस्तीसाठी 2 कोटी 26 लाख रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. तसेच आयु. युनानी दवाखाने बांधकामासाठी 48 लाख 81 हजार, आयु. युनानी दवाखाने दुरूस्तीसाठी 5 लाख 56 हजार, आदिवाशी उपाययोजना पीएचसी (टीएसपी) साठी 1 कोटी 77 लाख, आदिवाशी उपाययोजना एससी (टीएसपी) साठी 31 लाख 96 हजार, आदिवासी उपाययोजना पीएचसी (ओटीएसपी) साठी 73 लाख 20 हजार, असे एकूण 36 कोटी 26 लाख रूपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे.

कोट
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासकामे सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचे बांधकाम, देखभाल, दुरूस्तीची कामे गुणवत्तापूर्ण केली जातील, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे. दरम्यान, या कामांसाठी निधी वाटप करताना तालुका निहाय न करता, ज्या ठिकाणी आवश्‍यकता आहे, ते पाहून निधी देण्यात आला आहे.
-प्रविण माने
सभापती, आरोग्य आणि बांधकाम समिती, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)