आरोग्यास फायद्याचे ‘डाळींब’… वाचा परिपूर्ण फायदे

अनेक फळांपैकी एक असलेल्या डाळिंबाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबाचे फायदे प्राचीन काळात देखील समोर आले आहेत. त्वचाविकारांमध्ये डाळिंब प्रामुख्याने वापरले जातात. थोडसे रसाळ आणि थोडसे क्रंची असे डाळिंबाचे दाणे प्राचीन काळापासून आयुर्वेदात फायदेशीर असल्याचे समजले जातात.. मात्र याव्यतिरिक्तदेखील डाळिबांचे काही आरोग्यदायी फायदे आहेत.

ह्र्द्यविकाराची समस्या कमी होते – डाळिंबामुळे कोलेस्ट्रेरॉलचेही प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय फ्री रॅडीकल्सचा रक्त धमन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते.

-Ads-

ब्लड प्रेशर कमी होते – डाळिंबामुळे कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते परिणामी रक्तदाबही सुधारतो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यतादेखील कमी होते.

पचन सुधारते : पचनाचे विकार दूर ठेवण्यासाठी तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणे गरजेचे आहे. जंकफूड खाण्यामुळे फायबर शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. नियमित डाळींब खाल्ल्याने दिवसातील ४५% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

स्मृतीभ्रंशाची शक्यता कमी : अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंशासारख्या आजारामध्ये विसरभोळेपणा वाढण्याचा त्रास अधिक असतो. अशावेळी डाळींब खाणे हितकारी ठरते.

कॅन्सरचा धोका कमी होतो : डाळींबाचा रस ट्युमरची वाढ रोखण्यास मदत करतात. डाळींबातील दाहशामक घटक कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास मदत करतात. प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, स्तनांचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग व काहीजणांमध्ये त्वचेचा कर्करोग कमी होण्यासाठी डाळींब फायदेशीर आहे.

What is your reaction?
15 :thumbsup:
35 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)