आरोग्यास घातक कोलेस्टेरॉल

कोलेस्टेरॉल हा शरीराला आवश्‍यक असलेला पिवळ्या रंगाचा स्निग्ध पदार्थ आहे. हा घटक शरीराला आवश्‍यक आहे, पण जर बाह्य आवरण तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. यकृतातील ‘बाइल’ ह्या पाचक रसात कोलेस्टेरॉल हा मुख्य घटक असतो. तसेच मज्जातंतूचे बाह्य आवरण हे कोलेस्टेरॉलचे असते. इस्ट्रोजीन आणि आड्रोजीन या हार्मोन्समध्ये कोलेस्टेरॉल असते.

तसेच स्निग्धपदार्थ वाहून नेणे प्रतिकारशक्‍ती पुरवणे लाल पेशी व स्नायूंचे आवरणाचे संरक्षण करणे ही या कोलेस्ट्रॉलची महत्त्वाची कामे आहेत. आपल्या शरीरात यकृतात कोलेस्ट्रॉल तयार होते; परंतु 20 ते 30 टक्‍के आपण आहारातून घेतो. “बाइल’ या पाचक रसातील कोलेस्टेरॉल अन्न पचनाची क्रिया होताना अन्नातील कोलेस्ट्रॉलमध्ये मिसळतो आणि त्याचे प्रमाण 40 ते 50 टक्‍के इतके होते. जास्त प्रमाणातील कोलेस्ट्रॉल उत्सर्जनावाटे बाहेर टाकले जाते. रक्‍तातील कोलेस्टेरॉल हे लायपो प्रथिनासोबत असते. प्रथिन जर निम्न घनतेचे असेल तर रक्‍तवाहिन्यांमध्ये

साचून हृदयविकारांसारखे त्रास होऊ शकतात, पण तेच जर उच्च घनतेचे असेल तर ते जास्तीचे कोलेस्टेरॉल उत्सर्जित करून असे विकार टाळू शकतात. रक्‍तातील कोलेस्टेरॉलचे आपल्या हृदयाशी व त्या संबंधित होण्याऱ्या विकाराशी सरळ संबंध असतो. रक्‍तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले की हृदयरोगाचे प्रमाणही घटते.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे म्हणजे अयोग्य आहार, अवेळी खाणे, अति प्रमाणात तळलेले पदार्थ, दुधाचे अति प्रमाणात सेवन, दुधावरची साय अति प्रमाणात खाणे, बटर, चीझ, मैदा, साखर, केक, पेस्ट्री, बिस्कीट, आईस्क्रीम, मांसाहार, मासे, अंडी यामुळे रक्‍तातील कोलेस्ट्रॉल वाढते. दारू व धूम्रपान हे कोलेस्टेरॉल वाढण्याचे मुख्य कारण आहे.
हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. योग्य आहारामुळे आपण हृदयविकाराचे,पक्षाघाताचे, उच्च रक्‍तदाबाचे, विकारांचे प्रमाण कमी करू शकतो. त्यासाठी अति स्निग्धपदार्थ
आहारातून कमी करावेत. आपण जे स्निग्धपदार्थ खातो ते बरेचदा निम्न घनतेचे लायपो प्रथिने (ढीरपीषरीीं) वाढवणारे असतात. जसे बाजारात मिळणारे बटर, चीझ जंक फूडमध्ये वापरली जाणारी तेले, डालडा (वनस्पती तूप) ही सगळी किंवा मांसाहारातून जाणारे स्निग्धपदार्थ हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात व हे नैसर्गिक स्निग्धपदार्थ नसतात तर सॅच्युरेटेड (ीर्रीीींरींशव) स्निग्धपदार्थांवर प्रक्रिया करून बनवलेले असतात. मका, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, राईस (तांदूळ), ऑलिव यापासून बनवलेली तेले सेवन केल्यास निम्न घनतेची लयपो प्रथिने कमी होतात. त्यामुळे आपोआप कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तसेच आहारात तंतुमय पदार्थाचा समावेश जास्त असेल तरी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
गव्हाचा भरडा, कोंडायुक्‍त कणिक, तांदूळ, बार्ली, कडधान्य, बटाटा, बीट, गाजर, सलगम, आंबा, पेरू, पालेभाज्या, कोबी, भेंडी, लेतूएस, सेलरी, यामध्ये तंतुमय पदार्थ असतात. तसेच लेसिथिनसुद्धा फ़ोस्पेंलीपीडयुक्‍त स्निग्धपदार्थ आहे. तोसुद्धा कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो. गव्हाचा भरडा, यीस्ट यामध्ये ब 6 हे जीवनसत्त्व, कोलिन आणि इनेसिटोल हे असतात. तेसुद्धा कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ई जीवनसत्त्व रक्‍तातील लेसिथिन वाढवते. त्यामुळे आवश्‍यक स्निग्धाम्लाचे ज्वलन होऊ देत नाही. पर्यायाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही.

कोलेस्टेरॉल वाढले असेल तर…
पाच दिवस फलाहार घ्यावा त्यात तीन वेळा दर पाच तासांनी सफरचंद, अननस, पीच, पिअर, पपया, संत्री, द्राक्षे अशी फळे खावीत. रोज कोमट पाण्याचा एनिमा घ्यावा. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने वृक्‍क, मूत्रपिंड आणि त्वचा यातून टाकावू पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते म्हणून रोज किमान आठ ते दहा वेळा पाणी प्यावे. पाच दिवसांनंतर पुढीलप्रमाणे संतुलित आहार घ्यावा.
सकाळी उठल्यावर – कोमट पाणी + मध +लिंबू घ्यावे /आदल्या दिवशी रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये 25 काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजून ते पाणी व मनुका दोन्ही सेवन करावे.
न्याहरी – ताजी फळे खावीत आणि मध घालून एक पेला दूध घ्यावे.
दुपारचे जेवण – वाफेवर शिजवलेल्या भाज्या वाडगा भरून कोशिंबीर, दोन पोळ्या/एक भाकरी, एक पेला ताक.
संध्याकाळ – एखादे फळ/सूप/पेलाभर फळांचा रस .
रात्रीचे जेवण – कच्च्या भाज्यांचे सॅलड/मोड आलेले मूग/वन डिश मिल उदा ः पळीवाढी खिचडी, घावन इत्यादी.
रात्री झोपताना एक पेला दूध.
त्याचबरोबर कोलेस्टेरॉल कमी करण्याकरिता विशेष फायदेशीर सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल, एक कळीचा लसूण, चोथा युक्‍त अन्नपदार्थ.
व्यायाम – चालणे, पोहोणे, सायकल चालवणे.
योगासने – पवन मुक्‍तासन, उत्तानपादासन, पद्मासन, वज्रासन, अर्धमाछेद्रासन, शलभासन, शवासन ही आसने करावीत.
रोज दहा मिनिटे थंड पाण्याने कटिस्नान, आठवड्यातून एकदा बाष्पस्नान करावे. रोज 15 मिनिटे पोटावर माती लेप ठेवावा. कोरडा मसाजसुद्धा फार उपयुक्‍त ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)