आरोग्याची माहिती देणाऱ्या पोर्टलचे उद्‌घाटन

नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासाठी दंत आणि मुख्य आरोग्य चांगले असणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलास्ते यांनी केले आहे. जागतिक मुख आरोग्य दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री कुलास्ते यांच्या हस्ते मुख आरोग्याची माहिती देणाऱ्या एका पोर्टलचे उद्‌घाटन करण्यात आले.
या पोर्टलवर दंत आणि मुख आरोग्याविषयी माहिती आणि शिक्षण देणारी सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पोर्टलवर टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, त्या क्रमांकावरुन जनतेला दंतमुख आरोग्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे. कार्यक्रमाला खात्याचे सचिव सी. के. मिश्रा, महासंचालक डॉ. जगदिश प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)