आरोग्याची धुरा काळेंच्या खांद्यावर गोरे देणार का?

सातारा, (प्रतिनिधी) –
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची लक्तरे वारंवार निघत असताना जिल्हाधिकारी ते मंत्रालयापर्यंत तक्रारींचे गाऱ्हाणे पोहचले असून आरोग्य विभागाला शिस्त लावण्यासाठी सभा कामकाज पाहणाऱ्या राजेश काळे यांच्याकडे आरोग्याचा पदभार मुख्याधिकारी शंकर गोरे देणार, अशी दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.
शहरातील स्वच्छतेसह स्वच्छ सर्वेक्षण आणि साशा कंपनीचा ठेका हे वादग्रस्त मुद्दे असताना शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने तक्रारी वाढत असून साविआचे नेते खा. उदयनराजेंनी वारंवार पदाधिकारी आणि पालिका प्रशासनाची कानउघडणी केली होती. तरीही कचऱ्याचा प्रश्न निकाली लागला नाही. अशातच घंटा गाडीचा ठेका असलेल्या साशा कंपनीला पालिकेशी केलेल्या कराराप्रमाणे कामाचा परफोर्मंस दाखवता आलेला नाही. शिवदास साखरे फेब्रुवारी-2018 ला सेवानिवृत्त झाल्यानंतर चार आरोग्य निरीक्षक कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. नुकतेच घंटा गाडी चालकाने नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्याधिकारी शंकर गोरे आरोग्य विभागाची धुरा राजेश काळे यांच्याकडे सोपवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या शक्‍यतेला चार दिवसापूर्वीच दुजोरा मिळाला. राजेश काळे यांना मुख्याधिकारी शंकर गोरे यांना आरोग्य विभागाचा पण चार्ज दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. सभासचिव रेकॉर्ड रूम जन्म मृत्यू आणि आता आरोग्य अशा चार विभागाचा भार काळे यांच्या खांद्यावर असणार आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य काळे साहेब कसे जपणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काळे नको रे बाबा…
वसुली विभागाचा चार्ज घेतल्यानंतर मोठ्या धेंडांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे काळेंना आस्थापनेवर पाठवण्यात आले. मात्र, येथे चार्ज स्वीकारून काळेंनी काही अधिकाऱ्यांची चौकशी लावताना न्यायालयीन प्रकरणांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित केले होते. जिथे जातील तिथे संस्थेचा फायदा झाला पाहिजे हा उद्देश अंमलात आणून काम केल्याने सभा कामकाजाचा पदभार गेल्या काही महिन्यांपासून काळेंकडे होता. मात्र, आता आरोग्य विभागात ते याच हिस्ट्रीमुळे नको झाले तर नवल वाटायला नको. आरोग्य विभागात जे काही पडद्या आडून चाललय त्याचा पर्दाफाश होण्याची काही जणांना भीती आहे. काळे कारवाईचा बडगा उगारण्यात हुशार असल्याने धास्तावलेल्या मंडळीनी फिल्डिंग लावली होती. तरी पण काळेंना आरोग्य विभाग देण्यात आल्याने किमान पालिकेच्या कारभाराचे आरोग्य सुधारेल अशी चर्चा आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)