आरोग्यवर्धक नारळपाणी

श्रुती कुलकर्णी

आपला चेहरा सौंदर्यपूर्ण असावा व आहे त्या वयापेक्षा आपण लहान दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असते विशेषतः स्त्रियांना तर सौंदर्याची खूप आवड असते. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये व आपल्या चेहऱ्याची कांती नितळ असावी म्हणून नारळपाणी हे आठवड्यातून एकदा तरी घ्यावे.

आपल्या आहारात नारळ पाण्याला फार महत्वाचे स्थान आहे. आजारीच माणसाने नाहीतर निरोगी माणसाने सुध्दा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य राखण्यासाठी ते वरचेवर प्यायला हरकत नाही. आयुर्वेदाने नारळपाण्याला एक उत्तम उत्साहवर्धक आणि शक्तीवर्धक थंड पेय म्हणून मान्यता दिली आहे.

नारळपाण्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने ते मधुमेहींनाही चालते.

खेळाडूंना तर ते खूपच उपयुक्त आहे. मानवी शरीरास आवश्‍यक असणारी जीवनसत्वे खनिजे, प्रथिने आणि शर्करा नारळपाण्यातून मिळत असल्याने त्यातून शक्तीचा शरीराला त्वरित पुरवठा होतो.

ऍसिडिटी, अल्सर, जळजळ, पित्तनाश, उष्माघात, मूत्रविकार यावरही नारळपाणी परिणामकारक ठरते.

पण अशी शहाळी सगळ्याच शहरातून किंवा प्रत्येक राज्यातून उपलब्ध असतातच असे नाही. पुणे मुंबईसारख्या शहरातून जागोजागी शहाळ्यांच्या गाड्या दिसतात. अशांसाठी आजच्या स्पर्धेच्या युगात काही कंपन्या पुढे आल्या नसतील तरच नवल.

तुम्ही कोणत्याही ऋतूत आणि कोठेही अस हे “नारळपाणी’ तुम्हाला कुठेही मिळू शकते. नारळपाण्याचे सौंदर्यासाठी उपयोग…

डाएट करून अशक्तपणा, थकवा चक्‍कर आली असता.

अतिसार, ओकाऱ्यांवर.

उष्णतेमुळे लघवीस जळजळ, भाजल्यामुळे होणारा दाह कमी होण्यासाठी.

तरूणींनी, स्त्रियांनी नारळ पाणी घेतल्यास त्यांचा वर्ण उजळतो व रंगात तजेलदारपणा येतो.

कॅलशियमचे संतुलन राखता येते. नारळ पाण्याचा असा उपयोग होतो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी जेवणापूर्वी आणि वजन वाढविण्यासाठी “जेवणानंतर एक ग्लास नारळ पाण्याचा उपयोग करावा.

शेवटी शहाळ्यातले नैसर्गिक नारळपाणी केव्हाही सौंदर्यासाठी फायदेशीरच हे मात्र विसरु नका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)