आरोग्यपूरक वातावरणातूनच समाजाचा सन्मान – हर्डीकर

थेरगाव – स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहिले पाहिजे. आरोग्यपूरक वातावरण निर्माण केले तरच आपण समाजाचा सन्मान केला असे होईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

थेरगाव येथे प्रेरणा को-ऑप बॅंकेच्या 19 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रेरणा बॅंक, प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था, प्रेरणा शिक्षण संस्था आणि प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी बॅंकेचे संस्थापक तुकाराम गुजर, अध्यक्ष कांतीलाल गुजर, उपाध्यक्ष गबाजी वाकडकर, संचालक लक्ष्मण काटे, श्रीधर वाल्हेकर, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, राजाराम रंदिल, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे, संजय पठारे, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, मीना शेळके, शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, प्राचार्य यशवंत पवार, कैलास पवळे, राजकुमार सरोदे, सुनील सोनवणे, महेंद्र पवार, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बेहरे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

-Ads-

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, आपण स्वच्छतेचे रक्षक बनले पाहिजे. इतरांना अस्वच्छता करण्यापासून रोखले पाहिजे. आपल्या परिसरातील स्वच्छता व त्याबद्दल असणारा आदर हा खूप महत्त्वाचा आहे व आपण स्वयंशिस्तीने परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे आवाहन करत मी स्वतः कचरा टाकणार नाही, घरात निर्माण होणारा ओला व सुका कचरा याचे मी वर्गीकरण करेल व उघड्यावर कोठेही मी थुंकणार नाही, अशी प्रत्येकाने प्रार्थना केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बॅंकेचे अध्यक्ष कांतिलाल गुजर यांनी आपल्या प्रास्ताविकात बॅंकेचा कार्य विस्तार, भावी योजना स्पष्ट करत सतत सामाजिक उपक्रम राबविण्यात आम्ही पुढाकार घेऊन आम्ही सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी कटिबद्ध राहू असे सांगितले.

यावेळी बॅंक परिवारातील 800 सदस्यांनी थेरगाव परिसरात विविध गटांच्या माध्यमातून स्वच्छता केली. यावेळी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. उपाध्यक्ष गबाजी वाकडकर यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)