आरोग्यदायी सौंदर्यासाठी खबरदारी हवीच

सुजाता गानू

सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी सर्रास हल्ली सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. आज स्त्रियाच नव्हे तर पुरूष आणि लहान मुलेही आपल्या सौंदर्याबद्दल जागरूक झाली आहेत. आजकाल फेसपॅक, मॉईश्‍चरायझर, सनस्क्रीन लोशन ही ऐश नव्हे तर गरज बनली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते. वेगवेगळी लोशन्स, क्रीम वापरावी लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यायोग्य विविध सौंदर्यप्रसाधने बाजारात उपलब्ध असतात. विविध साबण, टूथपेस्ट, शांपू, लोशन, ड्रॉप्स नि अजून बरेच काही. सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींचा मारा तर सगळीकडून सतत असतोच. अशा वेळी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. आपले सौंदर्य हे आरोग्यदायी, निरोगी असले पाहिजे.

सौंदर्य प्रसाधने विकत घेताना…

*प्रसाधन विकत घेताना त्याची एक्‍सपायरी डेट लक्षपूर्वक पाहा.
* एक्‍सपायरी डेट निघून गेलेले उत्पादन कधीही वापरू नका.
* पाकिटावरील सूचना लक्षपूर्वक वाचा आणि वापर कसा करावा यासंबंधीच्या सूचनांचे पालन करा.
* हलक्‍या दर्जाचं उत्पादन वापरू नका.
* विकतच्या सौंदर्यप्रसाधनापेक्षा घरगुती उपाय म्हणजे टोमॅटो, काकडी, लिंबू, पुदिना अशा अनेक भाज्यांचा, पालेभाज्यांचा रस सौंदर्यासाठी वापरता येतो.
* कोणतेही प्रसाधन वापरात आणण्यापूर्वी पाकिटावर लिहिल्याप्रमाणे त्याची योग्य प्रकारे चाचणी करा. यामुळे ते प्रसाधन त्वचेला मानवणार आहे की नाही याची तुम्हाला कल्पना येईल.

नेलपॉलीश वापरताना….

चांगल्या प्रतीचे नेलपॉलिश नखांचे सौंदर्य निश्‍चितच वाढवते. नेलपॉलिश घट्ट झाल्यास त्यात 4/5 थेंब थिनर हे द्रावण टाकून ते पातळ करावे. स्वस्त नेलपॉलिश नखांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते. आपला पेहराव, वर्ण व प्रसंग यांना विचारात घेऊन नेलपॉलिश निवडावे.

नेलपॉलिश अर्धवट गेल्यावर नेलपॉलिश रिमूहरनेच ते काढावे म्हणजे नखांच्या वरील भागाला अपाय होत नाही. नखांनी पदार्थ सोलणे, बटणे लावणे, काढणे यामुळे नखांचे नेलपॉलिश निघणे, नखांचे बारीक तुकडे पडणे, नखांना चिरा पडणे इ. तक्रारी निर्माण होऊ शकतात.

आहारात पुरेसे कॅल्शिअम असल्यास नखांचे आरोग्य टिकवता येते. अशी सावधगिरी बाळगली तर सौंदर्यप्रसाधाचे कोणतेच दुष्परिणाम होणार नाहीत.

तारूण्य टिकवण्यासाठी!

प्रत्येकजणाला वाटते आपण सुंदर दिसावे पण पस्तीशी जवळ येऊ लागली, की वयाच्या काही खुणा शरीरावर दिसू लागतात. हे टाळण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्‍यक आहे. वाढत्या वयाबरोबर शरीरात होणारा बदल म्हणजे हार्मोन्सचे अनियमित प्रमाण. ऍस्ट्रोजेन आणि ह्युमन ग्रोथ हार्मोन या दोन्हींचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्वच्या सैल होण्यास सुरूवात होते. कर्टीझॉल या हार्मोनचे प्रमाण वाढते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते. हार्मोन्सची निर्मिती योग्य प्रमाणात व्हावी यासाठी पुरेशी झोप अत्यावश्‍यक आहे. ओट्‌सची धान्य, शेंगदाणे, मसूर यांसारखे ग्लायकेमिकयुक्‍त अन्नपदार्थ आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करावा. वाढत्या वयात त्वचेतील हायड्रोल्कोरिक आम्लाचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वच्या कोरडी आणि निस्तेज दिसते. त्यासाठी द्विदल धान्य, कंदमूळ, कडधान्य, चिकन ब्रॉथ यांचा आहारात समावेश करावा. केसांच्या तक्रारीही वाढत्या वयात दिसू लागतात. त्यासाठी अंड्यामधील पांढरा बलक, पालेभाज्या आणि मटनाचा आहारात समावेश करावा. आहारातल्या झिंकमुळे केसांचा रंग आणि चमक कायम राहते. त्यासाठी मासे, शिंपले याबरोबरच मशरूम खावे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, शरीरातील दूषित घटक बाहेर टाकण्यासाठी आवश्‍यक असते. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यासाठी “क’ जीवनसत्त्वयुक्‍त लिंबू, संत्र खावेत. कॅल्शिअमयुक्‍त आहार घ्यावा व आपले तारूण्य टिकवून ठेवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)