सातारा -जावळी तालुक्‍यातील कुडाळ येथील आरीष इम्तियाज मुजावर या सतरा वर्षाच्या युवकाची “स्कूल’ या नावाची शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकित झाली आहे. बारावी विज्ञान शाखेचा तो विद्यार्थी आहे. फिल्म मेकिंग या क्षेत्रात करिअर करण्याची जिद्द असल्याची माहिती अरिष दिली आहे.

ग्रामीण जीवन शैलीवरती भाष्य करणाऱ्या वेब सिरीजची सोशल मीडियामध्ये क्रेज आहे. याचे अनुकरण करून शहर व ग्रामीण भागतील मुले आपल्या मोबाइल कॅमेऱ्यातून शॉर्ट फिल्म विविध फेस्टिवल करिता बनवत असतात. अरिषने देखील याच प्रकारे विविध शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. शूटिंग, एडिटिंग, सिनेमोटोग्राफी, साऊंड डबिंग ही कौशल्ये आत्मसात करून शॉर्ट फिल्म केली जाते. याचे ज्ञान घेऊन सामाजिक विषय प्रभावीपणे मांडण्याचे काम आरिषने केले. घरची हालकीचे परिस्तिथी असताना आपल्या शिक्षणाची आवड व शाळेबद्दलचे प्रेम, परिस्थितीशी केलेले दोन हात, पेपर टाकण्याचे काम करत आपले घर व शाळा पूर्ण करण्याची कसरत “स्कूल’ फिल्म मध्ये पाहायला मिळते.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुणे येथे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्मचा होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये जगभरातून एकूण 1000 शॉर्ट फिल्म नामांकित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्कूल (शाळा) या शॉट फिल्म नामांकन झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)