आरबीआयमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसावा 

नाणेनिधीचा सल्ला : तणाव वाढल्याच्या घडामोडींकडे लक्ष देणार 

सरकार किंवा उद्योजकांची बॅंकांत ढवळाढवळ नको 

अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्याकडून खिल्ली 
रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनीं सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या कामात हस्तक्षेप करू नये, असे सांगितले होते. अन्यथा विविध बाजार माफ करत नसतात असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानांची आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यानी ट्‌वीट करून खिल्ली उडविली आहे. या आठवड्यात रुपयाचे मूल्य सुधारले आहे. निर्देशांक वाढले आहेत. या बाबी बाजाराकडून मिळालेली शिक्षा आहेत का असे गर्ग यांनी म्हटले आहे. स्थूल अर्थव्यवस्था सुधारल्याची लक्षणे दिसत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. गर्ग म्हणाले की, रुपयाचे मूल्य वधारले आहे. क्रुडचे दर कमी झाले आहेत. शेअरबाजाराचे निर्देशांक 4 टक्‍क्‍यानी वाढले आहेत रोख्यावरील परतावा 7.8 टक्‍क्‍यांच्या कमी आहे. ही विविध बाजारांनी भारताला केलेली शिक्षा आहे का? असे ते म्हणाले. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वॉशिंग्टन: भारतात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेदरम्यान मतभेद निर्माण झाल्याच्या बाबीकडे आमचे लक्ष आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. त्याचबरोबर जगातील कोणत्याही देशातील रिझर्व्ह बॅंकेच्या कामात सरकारने हस्तक्षेप करू नये असे नाणेनिधीचे मत असल्याचे या संस्थेच्या प्रवक्‍त्याने सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी बॅंकेची स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यानी बॅंकेने बेफाम कर्ज दिली गेली तेव्हा डोळेझाक केल्याचे सांगितले होते. त्यानंतर सरकारने बॅंकेला तीन पत्र पाठविल्याचे वृत्त आले होते. यामुळे सरकार आणि बॅंकेदरम्यान तणाव वाढला असून बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात होते. या घडामोडीनंतर नाणेनिधीने ही प्रतिक्रिया दिली आहे.

नाणेनिधीच्या प्रवक्‍त्याने सांगीतले की, कोणत्याही देशातील सरकारने किंवा उद्योजकांच्या संघटनेने त्या देशतीाल केंद्रीय बॅंकेच्या कमावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, असे नाणेनिधीला वाटते. अनेक देशातील सरकार प्रमुखानी किंवा मंत्र्यानी बॅंकाविरोधत वक्तव्य केली आहेत. त्यात अमेरिकेचाही समावेश आहे. असे होऊ नये असे नाणेनिधीला पूर्वीपासून वाटते असे त्यांनी सांगितले.

रिझर्व्ह बॅंकांना त्यांच्या नियमाप्रमाणे काम करू दिल्यास त्या देशाची अर्थव्यवस्था दीर्घ पल्ल्यात बळकट होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे या बॅंकांना पूर्ण स्वायत्तता असावी असा सल्ला वेळोवेळी नाणेनिधी सदस्य देशांना देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)