आरबीआयपेक्षा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेलाच महत्त्व – मनमोहन सिंग 

नवी दिल्ली: अर्थमंत्री व रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर यांच्यात मतभेद असले तर अर्थमंत्र्यांच्या भूमिकेला महत्त्व असते, असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्‍त केले आहे. सध्या केंद्र सरकार व आरबीआय यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सिंग यांचे हे प्रतिपादन मोदी सरकारच्या धोरणाची पुष्टी करणारे आहे. सिंग यांची कन्या दमन सिंग यांच्या पुस्तकात मनमोहन यांचे स्पष्टीकरण आले आहे.

“स्ट्रिक्‍टली पर्सनल: मनमोहन ऍण्ड गुरुशरण’ या पुस्तकात मनमोहन सिंग यांनी ते आरबीआयचे गव्हर्नर असतानाच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, विचारांची आदान प्रदान होतच असते. मला सरकारला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगायला लागायच्या. रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर हा अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा नसतो. आणि जर एखाद्या गोष्टीवर अर्थमंत्री आग्रही असतील तर गव्हर्नर ते नाकारू शकत नाही. अर्थात, नोकरी सोडण्याचा पर्याय खुला असतोच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावरून मोदी सरकार व गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यामध्ये सध्या कुरबुरी सुरू आहेत. विरोधकांनी हा स्वायत्त संस्थांवर होत असलेला हल्ला असे संबोधले जात आहे. तर सरकारच्या वतीने हे स्वाभाविक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते असलेल्या माजी पंतप्रधानांच्या उदगारांमुळे मोदी सरकारलाच बळ मिळणार आहे. चार वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या पुस्तकामध्ये सिंग यांनी सरकार व आरबीआय यांच्यामध्ये झालेल्या वाद-विवादांचा दाखला दिला आहे. आरबीआयची स्वायत्तता संपुष्टात येत असल्याचे सांगत आपण राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती असेही सिंग यांनी नमूद केले आहे.

तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याशी एका मुद्यावरून आरबीआयचे गव्हर्नर असलेल्या सिंग यांचे मतभेद झाले होते. मी आरबीआयला काय वाटते ते सांगितलं होते, परंतु सरकार आपले म्हणणे बाजुला ठेवून त्यांना हवे तसे वागू शकतात, असे सिंग यांनी स्पष्ट केले. मी माझा राजीनामाही पाठवला परंतु नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माझे म्हणणे पटले व त्यांनी सरकारची कल्पना बासनात गुंडाळल्याचे व आरबीआयचे ऐकल्याचेही सिंग यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)