आरबीआय’च्या निधी हस्तांतरणासाठी समिती

संचालक मंडळाची लघु उद्योगाच्या कर्जफेररचनेची रिझर्व बॅंकेला सूचना

वित्तीय देखरेख मंडळ बॅंकांवरील निर्बंधांचा घेणार आढावा 

मुंबई: सरकार आणि रिझर्व बॅंकेदरम्यान काही मुद्दयांवरून कथित तणाव असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभुमीवर दोघांमध्ये एक मॅरेथॉन बैठक पार पडली.

बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संक्षिप्त निवेदनानुसार रिझर्व बॅंकेकडील अतिरिक्‍त भांडवल वाटपाचे निकष ठरवण्यासाठी एक उच्चाधिकार प्राप्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लघु आणि मध्यम उद्योगांच्या अनुत्पादक मालमत्तांवर चर्चा झाली. या उद्योगांकडील 25 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची फेररचना करण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा, असे संचालक मंडळाने रिझर्व बॅंकेला सुचविले.

नऊ तास चाललेल्या या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील 11 बॅंकांवर लावलेल्या निर्बंधांवरही विचार करण्यात आला. या बॅंकांना त्यांची अनुत्पादक मालमत्ता जास्त असल्यामुळे व भांडवल पर्याप्तता कमी असल्यामुळे काही व्यवहारांवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. त्यातल्या त्यात कर्जपुरवठ्याच्या मर्यादांमुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याचे बोलले जाते. या विषयावर विचार करण्यासाठी वित्तीय देखरेख मंडळाला सांगण्यात आले आहे.

बॅंकेकडील अतिरिक्‍त भांडवल वाटपाचे निकष ठरवण्यासाठीच्या तज्ञ समितीच्या कार्यकक्षा आणि सदस्य रिझर्व बॅंक आणि केंद्र सरकार मिळून ठरवणार आहेत. रिझर्व बॅंकेकडे सध्या 9.69 लाख कोटींचे अरिरिक्‍त भांडवल आहे. रिझर्व बॅंक दरवर्षी झालेला नफा केंद्र सरकारकडे वर्ग करीत असते. मात्र रिझर्व बॅंकेला यापूर्वी झालेला नफा केंद्र सरकारकडे पाठवण्याची व्यवस्था सध्याच्या कायद्यात नाही.

याविषयावर सरकार आणि रिझर्व बॅंकेत मतभेद असल्याचे बोलले जात होते. मात्र रिझर्व बॅंकेकडील अतिरिक्‍त भांडवल आम्हाला नको आहे, असे अर्थ मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते. मात्र आज त्याच विषयावर समिती नेमण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

सरकारचे नामनिर्देशित संचालक आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग आणि वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार, स्वतंत्र सदस्य एस.गुरुमुर्ती यांची आणि “आरबीआय’चे गव्हर्नर उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर समोरासमोर चर्चा झाली. जवळपास 9 तास चाललेल्या या बैठकीमध्ये बॅंकांव्यतिरिक्‍त अन्य वित्तीय कंपन्यांना अधिक तरलता उपलब्ध करून देण्याबाबत सरकार आणि गुरुमूर्ती यांनी विशेष आग्रह धरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)