आरबीआय’चा आरक्षित निधी मिळवायचा सरकारचा प्रयत्न : पी. चिदंबरम 

नवी दिल्ली: केंद्र सरकार रिझर्व बॅंकेचा 9 लाख कोटी रुपयांचा आरक्षित निधी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. सरकार आणि रिझर्व बॅंक यांच्यात सोमवारी होणाऱ्या “आरबीआय’च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यताही असल्याचा दावाही चिदंबरम यांनी केला आहे.

रिझर्व बॅंकेच्या आरक्षित निधीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आणि सरकारमधील वाद धुमसत आहेत. त्याचे हेच कारण आहे, असे चिदंबरम यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे.
जगात कोठेही मध्यवर्ती बॅंक ही संचालक मंडळाद्वारे संचलित कंपनी नाही. खासगी उद्योजकांकडून बॅंकेच्या संचालकांना सूचना देणे ही एक विसंगत कल्पना आहे. त्यादृष्टीने 19 नोव्हेंबर हा दिवस रिझर्व बॅंकेच्या स्वायत्तेला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देणारा दिवस असणार आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

रिझर्व बॅंकेकडे 9.59 लाख कोटी रुपयांचा आरक्षित निधी आहे. या निधीचा एकतृतीयांश निधी मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे समजते आहे. कमकुवत बॅंकांना सहाय्य आणि लिक्‍वीडीटी वाढवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे, असे चिदंबरम म्हणाले.

राखीव भांडवल कायम राखण्याबाबत आरबीआयशी चर्चा सुरू असल्याचे केंद्र सरकारने 9 नोव्हेंबरला म्हटले होते. मात्र रिझर्व बॅंकेकडून 3.6 लाख कोटी रुपय मागणी केल्याचे सरकारने नाकारले होते. सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव रिझर्व बॅंकेला दिला गेल्याचे आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)