आरबीआयचा अहवाल मोठा घोटाळा सूचित करतो-ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दिलेल्या अहवालानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारवर चौफेर टीकेची तोफ डागली. नोटाबंदी म्हणजे पूर्णपणे फ्लॉप शो होता. नोटाबंदीबाबतचा आरबीआयचा अहवाल मोठा घोटाळा सूचित करतो. मोठ्या प्रमाणातील काळा पैसा उघड करण्यासाठी नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, आपल्या हाती मोठा भोपळा आला. नोटाबंदीमुळे देशाने चौथ्या तिमाहीत 3 लाख कोटी रूपये गमावले. अनेक लोक मृत्युमुखी पडले. नोटाबंदीमागे कुठला छुपा अजेंडा होता का, असा सवाल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली. चलनातून रद्द करण्यात आलेल्या बहुतांश नोटा बॅंकिंग व्यवस्थेत परतल्या. रांगांमध्ये 100 लोक मृत्युमुखी पडले. सर्वांत प्रतिकूल परिणाम गरिबांवर झाला. हे सर्व कशासाठी? नोटाबंदीने जीव गेले आणि उपजीविकेची साधनेही गेली. अर्थव्यवस्थेला झटका बसला. कामगारांनी रोजगार गमावला. या देशविरोधी कृत्याबद्दल भारत कधीच मोदी सरकारला माफ करू शकत नाही, असे ट्‌विट त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)