आरबीआयकडून लवकरच 350 रुपयांचे नाणे होणार जारी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 350 रुपयांचे नाणे जारी करणार आहे. गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या 350 व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी आरबीआय ही नाणी बाजारात आणणार आहे. ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत.

आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात. चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित 350 रुपयांचे हे नाणे 44 एमएमचे असेल. नाण्याच्या पुढच्या भागात अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेले असेल. याच भागात रुपयाचे चिन्ह आणि मध्ये 350 मुद्रीत असेल. तसंच नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा 350 वा प्रकाश उत्सव लिहिलेलं असेल. यावर 1666-2016 हे देखील मुद्रीत केलेले असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, नाण्याचे वजन 34.65 पासून 35.35 ग्रामच्या दरम्यान असेल. बाजारात किती नाणी जारी केली जाणार ह्याची माहिती अद्याप दिलेली नाही. आरबीआयकडून जारी होणाऱ्या 350 रुपयांच्या नाण्यात चांदीचं प्रमाण 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल पाच टक्के आणि झिंक पाच टक्के असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)