आरबीआयकडून बंधन बॅंकेला नव्या शाखा उघडण्यास मज्जाव 

सीईओ चंद्रशेखर घोष यांचा पगारही गोठविला 
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने बंधन बॅंकेला आणखी शाखा उघडण्यास मज्जाव केला आहे. त्याचबरोबर बॅंकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांचा पगार गोठविण्यास सांगितले आहे. परवाना देताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटींचा बॅंकेने भंग केला असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटल्याचे बंधन बॅंकेने सांगितले आहे.
आता बंधन बॅंक ज्या काही अटी राहिल्या होत्या त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे. बॅंकेच्या होलिंडग कंपनीचे बॅंकेत 40 पेक्षा जास्त भागभांडवल आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे भांडवल कमी केले नसल्यामुळे बॅंकेला आता आणखी शाखा उघडता येणार नाहीत अणि बॅंकेला रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नव्या शाखाही उघडता येणार नाहीत. त्याचबरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत घोष यांचा पगार सध्याच्या पातळीवर गोठविला जाणार आहे. सध्या बॅंकेच्या 937 शाखा आहेत. या घडामोडी अगोदर शेअरबाजारात बॅंकेचा शेअर काही प्रमाणात कमी झाला होता. आता सोमवारी शेअरच्या भावावर काय परिणाम होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)