आरती अंकलीकर व उस्ताद उस्मान खान यांना संगीत गुरु पुरस्कार

पुणे – कन्नड संघाचे संस्थापक डॉ. शामराव कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे यांनी दिली आहे. कन्नड संघ आणि कलमाडी परिवाराच्या वतीने पुढील वर्षभरात या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत होणा-या पहिल्या कार्यक्रमात येत्या शनिवार दि. 31 मार्च, रोजी गायिका आरती अंकलीकर टिकेकर, रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांचा संगीत गुरू पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम एरंडवणे, गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संगीत गुरू पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून शहरातील मान्यवर व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर आरती अंकलीकर टिकेकर आणि कर्नाटकी शैलीतील गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गायत्री वेंकटराघवन यांच्या सांगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम देखील होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)