आरडेप्रकरणी आरोपांचे खंडन

पिंपरी – रुग्ण दशरथ आरडे प्रकरणात रुग्णालयावर लावलेले आरोप तथ्यहिन असल्याचे स्पष्टीकरण चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रेखा दुबे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

दशरथ आरडे या रुग्णाला बीलासाठी डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी पोलीस तक्रारही दाखल झाली होती. सामाजिक संघटनांनी बिर्ला रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलने केल्याने वातावरण तापले होते. दरम्यानच्या कालावधीत कोणतीही प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनाकडून आली नव्हती. अखेर दोन आठवड्यानंतर बिर्ला रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आपली बाजू मांडण्यासाठी डॉ. रेखा दुबे पत्रकारांच्या समोर आल्या.

डॉ. दुबे म्हणाल्या की, आरडे प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी आहे. दशरथ आरडे यांचा मुलगा सागर आरडे हा स्वतः माहिती अधिकार कार्यकर्ता असून त्यांना सरकारी नियमानुसार राज्य सरकारी विमा (ईएसआयसी) या योजनेअंतर्गत सवलत देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना दारिद्य्र रेषेखालील योजनेचा लाभ देता येणार नव्हता. तसेच याबाबत त्यांनी कोणतीही चर्चा रुग्णालय प्रशासनाशी केली नाही.

उपचारा दरम्यान रुग्ण दशरथ आरडे यांच्याजवळ त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. याबाबत रुग्णालय प्रशासनानेच त्यांना वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरडे यांच्या पत्नी फक्त त्यांच्या जवळ होत्या. यानंतर 21 ऑगस्ट रोजी थेट पोलीस दाखल तक्रार झाली. त्यानंतर सारा प्रकार समोर आला. त्यावेळीही दशरथ आरडे यांच्या पत्नीच आरडे यांच्या जवळ होत्या. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी तथाकथित सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख व सागर आरडे हे पोलीस व प्रसिध्दी माध्यमांना सोबत घेऊन आले. यावेळी रुग्णालयात काही गोंधळ नको म्हणून आम्ही दशरथ आरडे यांना सोडून दिले, असे सांगत दुबे यांनी आरोप फेटाळून लावले.

अटक झालीच नाही!
पोलीस माझ्याकडे आले होते. मात्र आम्ही कायदेशीररित्या सर्व बाबी हाताळत आहोत. आपल्याला अटक झालीच नव्हती, असा दावा रेखा दुबे यांनी यावेळी बोलताना केला. या प्रकाराबाबत धर्मादाय आयुक्त अथवा त्यांच्या कार्यालयातूनही कोणताही फोन आला नव्हता. यावेळी केवळ अफवा पसरवल्या गेल्या. ज्याला खऱ्या उपचारांची गरज नसते अशाच व्यक्ती प्रसिद्धीसाठी हे सारे करतात. दशरथ आरडे यांना रुग्णालय प्रशासनाशी कोणतीही चर्चा न करता रुग्णालयातून हलवले. त्यानंतर दशरथ आरडे यांचा मृत्यू झाला. हा देखील आमच्यासाठी एक धक्काच होता, असे स्पष्टीकरण दुबे यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)