आरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान?

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात कारवाई करुन आणलेली वाहने, बेशिस्त पार्किंग, अनेक महिने एकाच जागेवर असलेल्या वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळे आरटीओ कार्यालयात पार्किंगला जागा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यात भंगार वाहनांची संख्या सर्वाधिक असून महिनोंमहिने ही वाहने एकाच ठिकाणी पडल्याचे दिसून येत आहे.

सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे आरटीओ कार्यालयाच्या कामाचा व्याप मोठा आहे. याचमुळे विविध कामासाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, आरटीओ कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या जुनी वाहने, दुचाकी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने आणि रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची वाहने यामुळे कार्यालयात सर्वत्र वाहनेच वाहने झाली आहेत. यात जुन्या वाहनांची संख्या वाढली असून काही वाहने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पडल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून या वाहनांमध्ये कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. तसेच, परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांच्या दाटीमुळे नागरिकांना उभे राहण्यासाठी मोकळी जागा मिळणेही कठीण झाले आहे. यामुुळे रोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासनाने जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची मागणी केली जात आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या न सुटता त्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)