आरटीओ कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन

पिंपरी – राज्यभरातील रिक्षा चालक, मालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातल सर्व आर.टी.ओ कार्यालयावर रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत, अशी माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

रिक्षा चालक, मालकांसाठी परिवहन खात्याअंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. ओला उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावी. इन्शुरन्सचे वाढलेले अवाजवी दर कमी करावेत. मुक्त रिक्षा परवाना बंद करावा. प्रत्येक आर.टी.ओ कार्यालयात 250 मीटरचा पासिंग ट्रॅक उभारावा. नवीन रिक्षाची ब्रेक टेस्ट बंद करण्यात यावी, या सह इतर विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील सर्व आर.टी.ओ कार्यालयांसमोर मंगळवारी (दि.27) आंदोलन करून शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.

-Ads-

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी दहा वाजता आणि पुणे आर.टी.ओ. कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आंदोलन करून पिंपरी चिंचवड आणि पुणे आर.टी.ओ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य न झालास रिक्षा बंद सारखे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)