आरटीओ ‘अपडेट’, सुविधा ‘आउटडेटेड’

वाढत्या बकालपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न


स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडे बोट

-Ads-

– गणेश राख 

पुणे – कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालय परिसरातील कचराकुंड्या भरुन वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण आहे. महिलांना स्वच्छतागृहात जाण्यासाठी यातूनच वाट काढावी लागते. अस्वच्छ पाणी, कचरा, कुजलेली “स्क्रॅप’ वाहनांमुळे हे शासकीय कार्यालय आहे, की भंगाराचे गोडाऊन? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचे हे मुख्य कार्यालय असल्याने येथील व्याप मोठा आहे. मात्र, आवारातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याने घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. शिकाऊ लायसन्स विभागात परवान्यासाठी रोज 400 ते 500 लोक येतात. तर, उजव्या बाजूस महिलांचे स्वच्छतागृह आहे. त्यासमोरच कचराकुंडी भरुन वाहते आहे. जुनी “स्क्रॅप’ वाहने कुजली आहेत. या सगळ्या गोंधळात स्वच्छतागृह कोठे आहे, हे शोधावे लागते. त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणी येत आहेत. दरम्यान, यासारख्या गंभीर विषयाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सुविधांसाठी तंत्रज्ञान वापरून “अपडेट’ असल्याचा आव आणणारे आरटीओ कार्यालय प्रत्यक्षात मात्र “आउटडेटेड’ असल्याचे दिसत आहे.

आरटीओ परिसरातील स्वच्छतागृहात जाण्यासाठी कचराकुंडी, यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, यातून वाट काढावी लागते. जुनी वाहने पडून असल्याने यात पाणी साचून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये.
– गणेश पाटोळे, नागरिक


वेळोवेळी परिसरातील स्वच्छता केली जाते. मात्र, महापालिकेने जर गेल्या काही दिवसांपासून साफसफाई केली नसेल, तर चौकशी करुन त्यांना सांगितले जाईल.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)