आरटीओत वाहन नोंदणीसाठी रांगा

कमी मनुष्यबळाचा फटका : येत्या काळांत प्रशासनावर पडणार अधिक भार

पुणे – आरटीओतील कामासाठी नागरिकांना महिनोंमहीने वेटींग करावी लागत असून यानंतरही काम होण्याची शक्‍यता कमी आहे. आरटीओतील कमी मनुष्यबळाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून व्यावसायिक वापरासाठी खरेदी केलेल्या नवीन वाहनांच्या नोंदीसाठी पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागत आहेत. दरम्यान, सध्या सुट्ट्या असल्याने वाहनांची संख्या वाढणार असून येत्या काळांत अधिक भार प्रशासनावर पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यावसायिक वापराच्या नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी आरटीओकडून अपॉइन्टमेंट पद्धत राबवण्यात येत आहे. ही अपॉइन्टमेंट ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीने दिली जात आहे. त्यामुळे संबंधितांना आरटीओ कार्यालयात येऊन अपॉइन्टमेंट घ्यावी लागत आहे. पुणे आरटीओत साधारणपणे दररोज दीडशे व्यावसायिक वापराची वाहने नोंदविली जात होती. त्या तुलनेत एका दिवसात केवळ 120 वाहनांना अपॉइन्टमेंट दिली जात आहे. त्यामुळे आपला नंबर लावण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अगदी पहाटे साडेपाच वाजतापासून नागरिकांची रांग लागत आहे. मात्र, कार्यालयीन कामकाज सकाळी दहा वाजता सुरू होत असल्याने तासनतास नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, यासाठी सुट्टीच्या दिवशीही काही प्रमाणात काम केले जात असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालायातील अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)