“आरटीओ’तील अग्निरोधक यंत्रणा अडगळीत

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी सकाळी आग लागून काही महत्त्वाची कागदपत्रे जळात झाली. यामुळे कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा समोर आला. दरम्यान, गुरुवारी केलेल्या पाहणी आरटीओ कार्यालयात असलेल्या अग्निशमन रोधक यंत्रणा अडगळीत दिसून आल्या. त्याचबरोबर यातील बहूतेक यंत्रणा या वापरण्यास अयोग्य असून त्यांची मुदतही संपचेही दिसून आले. यामुळे पुन्हा जर अशा प्रकारची घटना घडली, तर सुरक्षेच्या दृष्टीने उपाय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या आरटीओ कार्यालयाच्या सुरक्षिततेचे तीन-तेरा वाजले आहेत. अस्ताव्यस्त वायरिंग आणि अडगळीतील अग्निरोधक यंत्रणेमुळे आरटीओ कार्यालयातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. आरटीओची कामे संगणीकृत झाल्याने डेटास्वरुपात नोंदी जतन राहणार आहेत. मात्र, ऑनलाइन वगळता आणखी बरेच कागदपत्रे रोज आरटीओकडे जमा होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरटीओच्या नोंदीमध्ये एकूण 19 फायर एक्‍सटिंन्शर (अग्निरोधक यंत्रणा) कार्यरत आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत 7 ते 8 यंत्रे आढळून आली. त्यापैकी पाच यंत्राची मुदत संपली असून ते अडगळीत आहेत. तर काही यंत्र इतकी जुनी झाले आहेत, की त्याचा वापर करता येऊ शकत नाही. त्यामुळे ही यंत्रणा कुचकामी असल्याचे समोर आले आहे. पुणे आरटीओर्तंगत बारामती, पिंपरी-चिंचवड, अकलूज, सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. दरवर्षी वाहन विक्री कर, आर्कषक क्रमांक तसेच विविध करांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा महसूल राज्य शासनाला दिला जातो. प्रत्यक्षात मात्र, अग्निरोधक यंत्रणा सक्षम नसल्यामुळे महत्त्वाची कागदपत्रांची सुरक्षाच धोक्‍यात आली आहे.

आरटीओतील अग्निरोधक यंत्रणा कार्यरत आहे की नाही, याबद्दल माहिती घेण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. ही यंत्रणा सक्षमरित्या काम करत नसल्यास ती पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली जाईल.
प्रशांत रणपिसे, अग्निशामक विभाग प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)