आरटीओचे वरातीमागून घोडे!

ट्रॅव्हल्सवर दिवाळी संपल्यावर कारवाई : तपासणीसाठी 3 पथके

पुणे – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून तिकीटासाठी दुप्पट ते तिप्पट वाढीव दराने आकारणी केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ऐन सणासुदीत झळ बसत आहे. मात्र, आधी आणि दिवाळीत आरटीओने ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई न करता सरतेशेवटी पथक स्थापून तपासणीला सुरूवात केली आहे. यामुळे अधिकार असूनही तपासणी न केल्याने अनेकांना याचा फटका सहन करावा लागल्याचे दिसून येत आहे.

दिवाळी सुट्टीत रेल्वे, एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून जातात. परिणामी, नाईलाजास्तव खासगी टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात येते. याचा फटका दरवर्षीप्रमाणे प्रवाशांना बसला असून अनेकांना वाढीव दराने तिकीट काढून प्रवास करावा लागला. यासंदर्भात काही नागरिकांनी आरटीओकडे ऑनलाइन तक्रारही केली आहे. मात्र, यासंदर्भात दिवाळीच्या शेवटच्या दिवशी तीन तपासणी पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत दि. 11 आणि 12 नोव्हेंबरदरम्यान शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, कात्रज, पुणे स्टेशन आदी परिसरांत ट्रॅव्हल्सचालकांची तपासणी करण्यात आली. दोन्ही दिवस सायंकाळी 4 ते 11 पर्यंत पथकांना तपासणीची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, पथकांकडून अनेक बसेसची तपासणी करण्यात आली असून यासंदर्भातील लेखी अहवाल रविवारी देण्यात येणार आहे. मात्र, दिवाळी संपल्याने आणि प्रवासी मिळण्याच्या स्पर्धेत आता काही ट्रॅव्हल्सचालकांकडून तिकीटदर कमी करण्यात आले आहेत. यामुळे बसचालकांची तपासणी ऐन दिवाळीत केली असती तर प्रवाशांना याचा फायदा झाला असता, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

उशीरा का होईना आरटीओ प्रशासनाने कारवाईला सुरवात केली, ही चांगली बाब आहे. मात्र, ऐन दिवाळीत लोकांना जादा पैशांने तिकीट काढून प्रवास करावा लागला. यामुळे दिवाळीच्या काळात आकारण्यात आलेल्या तिकीटदराचीही तपासणी करावी. जादा तिकीटदरासंदर्भात आरटीओकडे ऑनलाइन तक्रारही केली आहे.
– दीपक चटप, विद्यार्थी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)