आरटीओची ट्रॅव्हल्स चालकांसोबत बैठक

दिवाळीत प्रवाशांची लूट : जादा भाडे आकारणी संदर्भात होणार चर्चा

पुणे – शासन नियमानुसार राज्य परिवहन (एसटी) तिकीटदरापेक्षा दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार ट्रॅव्हल्सचालकांना आहे. मात्र, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर जादा भाडे आकारणी प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील ट्रॅव्हल्स संघटनांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. यात जादा दर न घेण्याच्या सूचना देण्यात येणार असून दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होते. या काळात राज्य परिवहन (एसटी) बसेस हाऊसफुल होत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांकडून खासगी बसेसने प्रवास करतात. याचा फायदा घेत खासगी चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभाग सतर्क झाला असून या कालावधीत बसेसची तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वी ट्रॅव्हल्सचालकांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक येत्या दोन दिवसांत होणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शासन निर्णयानुसार राज्य परिवहन (एसटी) आकारत असलेल्या तिकीट दरापेक्षा दीडपड जादा भाडे आकारण्याची सवलत खासगी चालकांना दिली जाते. यापेक्षा जादा भाडे आकारल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकाच्या माध्यमातून जादा भाडे आकारणाऱ्या बसेसवर लक्ष ठेवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)