“आरटीओ’ची आजपासून कसरत

सलग सहा सुट्ट्यानंतर कामकाज सुरू होणार

पुणे – दिवाळीनिमित्ताने आलेल्या सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर आज प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणार आहे. सुट्टी कालावधीतील अपुरी कामे करण्यासाठी सोमवारपासून (दि.12) “आरटीओ’ कार्यालयात अर्जदारांच्या रांगा लागणार आहेत. मात्र, कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कसरत लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

-Ads-

सद्यस्थितीत विविध कामासाठी आरटीओत सकाळपासूनच रांगा लागत असून यात आणखी भर पडणार आहे. शिकाऊ वाहन परवाना काढण्याऱ्या अर्जदारांना दिवाळीतील कार्यालयीन सुट्यांमुळे पुढील आठवड्यातील अपॉइंटमेंट देण्यात आल्या आहेत. दरदिवशी 350 अर्जदारांना लर्निंग लायसन्स वितरित करण्यात येते. दरम्यान, सलग सहा दिवस सुट्यांमुळे अर्जदारांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यातच संबंधित दिवसाची अपॉइंटमेंसह असलेल्या नागरिकांचे कामेही अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे वाहन फिटनेस, शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहनांची नोंदणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे. पक्का वाहन परवाना आणि वाहन नोंदणीचे कामेही सोमवारपासून सुरू होणार आहेत. यामुळे आजपासून अधिकाऱ्यांना अधिक वेळ काम करावे लागण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)