‘आरटीई’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

पिंपरी, (प्रतिनिधी) – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गंत (आरटीई) चौथ्या फेरीअखेर पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 176 विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. “आरटीई’ प्रवेशासाठी आणखी पाचवी व अंतिम फेरी होणार असून 983 प्रवेशांसाठी मुलांना अर्ज भरता येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड मधील शाळांमध्ये “आरटीई’ प्रवेशाबाबत अक्षरशः गोंधळ उडायचा. मात्र, या वर्षी शिक्षण मंडळाच्या नियमित कामकाजामुळे काही प्रमाणात “आरटीई’ प्रवेशाची प्रक्रीया सुरळीत सुरु आहे. शासनाकडून “आरटीई’ प्रवेशासाठी पाच फेऱ्या घेण्यात येणार आहेत. त्यातील चार फेऱ्या आजअखेर पूर्ण झाल्या आहेत. आज रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील 161 शाळांमध्ये 2 हजार 176 विद्यार्थ्यांना “आरटीई’अंतर्गत प्रवेश निश्‍चित झाला आहे.
त्यामध्ये 140 इंग्रजी, 20 मराठी आणि एका ऊर्दू माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. शाळा व 25 टक्के जागांनुसार एकूण 3 हजार 155 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. आरटीई प्रवेशासाठी तब्बल 5 हजार 717 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. प्रवेशाची पाचवी व शेवटची फेरी राहिली असून त्यामध्ये 983 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. त्यामुळे उर्वरित 2 हजार 562 विद्यार्थ्यांना “आरटीई’ प्रवेशास मुकावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)