आरटीई प्रवेशाला 4 एप्रिलपर्यंत मुदतवाढ…

सहाय्यक संचालकांनी घेतली जिल्हा परिषद शिक्षण विभागाची झाडाझडती

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या 25 टक्‍के राखीव जागांवरील प्रवेशाला राज्याकडून मुदतवाढ मिळाली आहे. पहिल्या फेरीत नाव आलेल्या पालकांना आता 11 दिवसांची मुदतवाढ मिळाली असून त्यांना 4 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली. दरम्यान दैनिक प्रभातने शुक्रवारी प्रसिध्द केलेल्या आरटीई हेल्पलाईन नोंदवही व एकूणच लपवाछपवी प्रकार समोर आणल्यानंतर राज्याच्या सहाय्यक संचालकांकडून या गोष्टींचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

प्रवेशाला 4 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच फाटक्‍या नोंदवहीबाबत सहाय्यक संचालकांनी जाऊन तपासणी केली असून नोंदवही योग्य पध्दतीने लिहिण्याबाबत आदेश दिले आहेत.
शरद गोसावी, राज्य उपसंचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय

आरटीई प्रवेशादरम्यान पहिल्या फेरीत 10 हजार 228 पालकांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. मात्र अनेक शाळा आम्ही न्यायालयात गेलो असल्याचे सांगत पालकांना प्रवेश देण्यास नकार देत आहे. यामध्ये काही शाळांनी तर चक्‍क पालकांकडून कागदपत्रे घेतली असून ती त्यांना परतही केलेली नाही. दरम्यान न्यायालयाने या शाळांना 28 मार्च पर्यंत अभय दिल्याने शाळांनी प्रवेशास नकार दिला आहे. त्यामुळे 10 हजारांपैकी 3 हजार 629 प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित सात हजार प्रवेशांसाठी 4 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्पेश यादव म्हणाले, शासनाकडून रक्कम मिळाली नाही म्हणून शाळा आरटीई प्रवेशास नकार देण्याचे धाडस हे फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुंळेच घडत आहे. शासनाच्या संगनमतानेच शाळा प्रवेशास अडवणूक करते की काय अशीच शंका निर्माण होते? शाळांनी प्रवेश न दिल्यास व शासनाने प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाई न केल्यास मनसे स्फाईल आंदोलन करण्यात येईल.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)