आरटीई प्रवेशाची दुसरी सोडत लांबणीवर

पुणे- शिक्षण हक्‍क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित जागांच्या प्रवेशासाठीची दुसरी सोडत शनिवारीही (दि. 21) काढण्यात आली नाही. दुसऱ्या फेरीतील रिक्‍त जागाच निश्‍चित न झाल्याने ही सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी सोडत काढली जाईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आरटीईअंतर्गत दुसरी सोडत बुधवारी (दि.18) काढली जाणार होती.

तांत्रिक कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलून शनिवारी सोडत काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी सोडतीची पालक आतुरतेने वाट पाहत होते. पण शनिवारी उशिरापर्यंत रिक्‍त जागा निश्‍चित होऊ शकल्या नाहीत. आरटीई प्रक्रियेविरोधात काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतही या शाळांमध्ये प्रवेश झालेले नाहीत. आता दुसऱ्या फेरीतही या शाळा येणार नसल्याने या फेरीसाठी एकूण रिक्‍त जागा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शनिवारी सोडत काढता आली नाही. आता पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी सोडत काढण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)