आरटीई प्रवेशाची दुसरी फेरी दि. 18 पासून

पहिल्या फेरीत पात्र विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश नाही

पुणे- शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्‍के राखीव जागांवरील ऑनलाइन प्रवेशाची पहिली फेरी शुक्रवारी संपली. यानंतर दुसरी फेरी दि. 18 व 19 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार होणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

शिक्षण हक्‍क कायद्यानुसार, राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीसाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. शुक्रवारी ही मुदत संपली. यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अंतिम टप्प्यात प्रवेशासाठी पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु बहुतांश ठिकाणी निश्‍चित झालेल्या प्रवेशाच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रवेशाची संख्या कमी आहे. शाळांच्या मुजोरीमुळे अनेक पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवली. तसेच काही शाळा शुल्क प्रतिपूर्तीसाठी न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे प्रवेशाची संख्या घटलेली दिसत आहे.

-Ads-

याबाबत बोलताना गोसावी म्हणाले, आरटीईची पहिली फेरी आज संपली असून पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश न घेतलेल्या मुलांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार होणार नाही. ऑनलाइन सोडतीत नाव जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी काढण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीची सोडत दि. 18 व 19 एप्रिल रोजी काढावी, असे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

पुण्यातील प्रवेशाची स्थिती
शाळा    जागा       प्रवेश क्षमता    झालेले प्रवेश
935   16437     10284          6831

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)