“आरटीई’ परतावा न मिळाल्यामुळे जुनी सांगवीतील शाळा बंद

पिंपरी – आरटीई (राईट टु एज्यूकेशन) मधील विद्यार्थ्यांचा निम्मा परतावा सरकारने मागच्या पाच वर्षात दिलेला नाही. त्यामुले जुनी सांगवी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणेज शाळा व्यवस्थापनाने आरटीईसह इतर विद्यार्थ्यांचेही निकाल व शाळा सोडल्याचे दाखले पोस्टाने घरपोच पाटवले आहेत.

या शाळेत एकूण 285 विद्यार्थी शिकत होती. त्यामध्ये 35 विद्यार्थी आरटीईअंतर्गत शिकत होती. या मुलांचे पाच वर्षांचे एकूण 29 लाख रुपये परतावा होता. त्यापैकी सरकारने केवळ 16 लाख रुपये 2016 -17 मध्ये दिले आहेत. तर अजूनही 13 लाख रुपये थकबाकी आहे. थकीत परतावा मिळावा म्हणून सरकारकडे प्रयत्न करुनही सरकारकडून कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रतामिख व महापालिकेच्या शिक्षण विभागसह पालकांनाही नोव्हेंबरमध्ये शाळा बंद करणार असल्याचे लेखी कळविले होते. यावर्षी सरकार थकबाकी देईल या आशेवर प्रवेश दिल्यावस आणखी आरटीई विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागेल व आणखी आर्थिक बोजा व्यवस्थापनवर येईल. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)