आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदतवाढ

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25 – राज्य शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून आर.टी.ई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा आर.टी.ईची पहिली फेरी झाल्यानंतर विमुक्त जाती (अ), भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग तसेच एचआयव्ही बाधित या गटांतील बालकांचा वंचित गटात नव्याने समावेश करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गटातील मुलांना प्रवेश देण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 24 ते 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या पालकांना पहिल्या प्रवेश फेरीमध्ये अर्ज करता आला नाही त्यांनाही यामध्ये नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ज्या पालकांनी सुरवातीला अर्ज केले असतील त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्‍यकता नाही. सदर ऑनलाईन अर्ज www.student.maharashtra.gov.in या संकेस्थळावर किंवा मोबाईल ऍपद्वारे भरता येईल. यावेळी सन 2018-19 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2016-17 किंवा 2017-18 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 31 मे नंतर दुसऱ्या सोडतीची तारीख प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)