“आरटीई’त प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी

पिंपरी – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत राखीव 25 टक्‍के जागांवर प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप करत संबंधित शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोसरी येथील बहुजन हिताय, बहुजन सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष गिरीश वाघमारे यांनी केली आहे.

यासंदर्भात वाघमारे यांनी महापालिका शिक्षण विभागाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2018-2019 मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील लॉटरीमध्ये पात्र ठरलेल्यांना 14 ते 24 मार्च 2018 पर्यत संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु, शहरातील अनेक शाळा पालकांना किरकोळ कागदपत्रांच्या त्रुटी दाखवून विनाकारण प्रवेश नाकारत आहेत. पालकांनी याबाबत आपणाकडे संबंधित शाळेची तक्रार केल्यास केवळ नोटीस देण्याचा पवित्रा घेण्यात येत आहे.

या शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पालक वर्ग नाराज आहे. शाळांच्या या भुमिकेबाबत व शिक्षण विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शासनाकडून मागील वर्षाचे प्रवेश शुल्क मिळण्यासाठी खासगी शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर निकाल होईपर्यंत प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया 24 ऐवजी 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)