आरटीईच्या विद्यार्थ्यांचे पैसे नाही म्हणून थेट शाळाच बंद

नवी सांगवीतील प्रकार: विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले
पुणे  – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत दिल्या गेलेल्या प्रवेशाचे तब्बल 13 लाख थकविले असल्याने नवी सांगवीतील नॅशनल स्कूल बंद करण्यात आली असल्याची माहिती शाळेने विद्यार्थ्यांना दाखले पोस्टाने पाठवत दिली आहे. याविरोधात आज उपमहापौर सिध्दांत धेंडे आणि पालकांनी थेट शिक्षण आयुक्‍तांचे कार्यालय गाठले.
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षात मोठ्या प्रमाणावर आरटीई प्रवेश झाले आहेत. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशापोटी शासनाकडून शाळांना जी तुटपुंजी रक्‍कम दिली जाते ती रक्‍कमही वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे आता आम्हाला शाळा सुरु ठेवणे अवघड झाले असल्याचे सांगत नवी सांगवी येथील शाळेने पोस्टाने विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठवून दिले आहेत.

नवी सांगवी येथील नॅशनल इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलने काढलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, “”आम्ही गेल्या तीस वर्षापासून शाळा चालवित आहोत. मात्र आरटीईच्या आजवर तीन चार वर्षातील प्रवेशाच्या बदल्यात आजवर आम्हाला एक छदामही शिक्षण विभागाकडून मिळालेला नाही. शिक्षण विभागाकडून आम्हाला 13 लाख रुपयांचे येणे आहे. परंतु शिक्षण विभागाने ते अद्यापही दिलेले नाहीत. तसेच शिक्षण विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आम्ही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मदतीने जगासमोर आणले. त्यांना जे शासन व्हायचे ते होईल. परंतु आता आम्हाला शाळा चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे शक्‍य असल्यास दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा” असे आवाहन पालकांना शाळेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान या एकूणच प्रकाराबाबत शासन आणि शाळा यांच्या भांडणात घटनेने दिलेल्या हक्‍कांसाठी आम्हाला का लढावे लागत आहे असा प्रश्‍न विचारत उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी पालकांसह शिक्षण आयुक्‍त कार्यालय गाठले व शाळेवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)