पुणे – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) देण्यात येणाऱ्या राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी लॉटरी बुधवारी काढण्यात आली. या लॉटरीतून 2 हजार 281 मुलांना शाळेत प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांनी आवश्‍यक कागदपत्रांसह दि. 19 जुलैपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. पुणे जिल्ह्यातील 930 पात्र शाळांमधून 16 हजार 291 जागांसाठी 43 हजार 583 अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीईच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून तिसरी लॉटरी आता काढण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. प्रवेशाबाबत अडचणी आल्यास पालकांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी प्रशासकीय अधिकारी, पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी प्रशासकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण कार्यक्षेत्रातील पालकांनी पुणे जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन शिक्षणाधिकारी हारुन आत्तार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)