आरटीईची आठवी फेरी जिल्हा परिषदेमुळे रखडली

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशाची प्रक्रिया अद्यापही संपलेली नाही. या 25 टक्‍के राखीव प्रवेशाची सध्या शेवटची फेरी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरीही जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संथ कारभारामुळे आठव्या फेरीला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे.

आरटीई प्रवेशाच्या पुण्यात सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांतर्गत देण्यात आलेले प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन दाखविल्यानंतरच रिक्‍त जागांचा तपशील काढत पुढील फेरीचे प्रवेश करण्यात येणार आहेत. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत येणाऱ्या शाळा तसेच पिंपरी चिंचवड मधील शाळांचे प्रवेश पूर्णपणे देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत अद्यापही प्रवेश किती झालेत हे चित्र स्पष्ट झालेले नाही. तेथील शाळांनी ऑनलाईन आकडेवारी भरली नसल्याने रिक्‍त जागांचा तपशील मिळालेला नाही. यामुळेच आठवी फेरी काढण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र शाळा सुरु होऊन तीन महिने पूर्ण होत आले तरीही आरटीईची प्रवेश प्रक्रिया संपलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)