“आरटीआय’ कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून 5 लाखाचे इनाम 

मुंबई – पालघर जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रेमकांत शिवाजी झा यांच्या हत्येच्या तपासासाठी सीबीआयने 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. प्रेमकांत झा यांच्या हत्येचा तपास सीबीआयच्या विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. झा यांच्या मारेकऱ्याबाबत माहिती देणाऱ्यांना 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्याबाबतची जाहिरात “एसटीएफ’च्यावतीने आज मराठी दैनिकांमधून प्रसिद्ध करण्यात आली. माहिती देणाऱ्या व्यक्‍तीचे नाव गोपनीय राखले जाणार आहे.

“भ्रष्टाचार वा अत्यचार विरोधी समिती’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते प्रेमकांत झा यांची विरारमध्ये 24 फेब्रुवारी 2012 साली हत्या झाली होती. झा यांच्यावर काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. झा यांचे हेल्मेट छेदून या गोळ्या झा यांच्या डोक्‍यात घुसल्या होत्या. या प्रकरणी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद विरार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर झा यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. या हत्येचा तपास मानवी तस्करी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र तपासामध्ये पुढे काहीही प्रगती होऊ शकली नव्हती.
ऑक्‍टोबर 2014 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीबीआयने 2016 साली एका बांधकाम व्यवसायिकाला या प्रकरणी अटक केली. या व्यवसायिकाच्या बेकायदेशीर बांधकामांची माहिती झा यांनी मागवली होती. म्हणून झा यांच्या हत्येची सुपारी या बांधकाम व्यवसायिकाने दिली होती. बेकायदेशीर बांधकामे असलेल्या अन्य व्यवसायिकांकडून झा यांनी खंडणी घेतली होती, असाही संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)